
NCP Chief Sharad Pawar | निवडणूक आली तर जनता काय करेल ते सांगण्याची गरज नाही – शरद पवार
मंचर/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Chief Sharad Pawar | सत्ता येते सत्ता जाते, सत्तेला चिकटून राहण्याची भूमिका घेतली तर लोक निकाल लावतात. ज्यांनी निवडून दिले त्यांचा विचार केला नाही. त्यामुळे यापुढे निवडणूक आली तर जनता काय करेल ते सांगायची गरज नाही, असे विधान राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी केले. जुन्नर येथून पुण्याकडे जाताना मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती (Manchar Krishi Utpanna Bazar Samiti) समोर थांबून त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी शरद पवार म्हणाले, आंबेगाव तालुक्यात मी यावे यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह होता. अनेक वर्ष राजकारणात असताना लोकांचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने राज्यात वेगळे राजकारण झाले. सत्ता येथे जाते, त्या सत्तेला चिकटून राहायचे नसते. तुम्ही चिकटून राहण्याची भूमिका घेतली तर लोक निकाल लावतात असे म्हणत आता राज्यातील राजकारण वेगळे झाल्याचे त्यांनी म्हटले.
ज्यांची तुम्ही मते घेतली ज्यांनी तुम्हाला निवडून दिले त्या जनतेचा तुम्ही विचार केला नाही. ही जनतेची फसवणूक आहे. लोकांना संधी मिळते त्यावेळेस ते योग्य निकाल लावतील. वर्ष दीड वर्षात निवडणूका होणार आहेत. त्यावेळेस संधी मिळाल्यानंतर तुम्ही काय कराल ते सांगण्याची गरज नाही, असा टोला शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी लगावला. तसेच आंबेगाव तालुक्यातील जाहीर सभेत सविस्तर बोलू असेही त्यांनी म्हटले.
यावेळी शरद पवार यांच्या सोबत खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe), आमदार अशोक पवार (MLA Ashok Pawar), भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम होते.
देवदत्त निकम यांनी प्रास्ताविक करताना सदिच्छा भेट घेतल्याबद्दल शरद पवार यांचे आभार मानले.
बाजार समितीच्या वतीने सभापती वसंतराव भालेराव,
संचालक निलेश थोरात, लक्ष्मण बाणखेले, राजेंद्र भंडारी, माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले, सुहास बाणखेले,
बाजीराव मोरडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर, दत्ता थोरात,
सुरेश आण्णा निघोट, बाळासाहेब रंगनाथ बाणखेले यांनी स्वागत केले.
कार्यक्रमाचे कोणतेही नियोजन नसताना दुपारी उशिरा शरद पवार येणार
असल्याची माहिती कार्यकर्त्यांना समजल्याने कार्य़कर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले होते.
विशेष म्हणजे शरद पवार गटासोबतच सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे कार्यकर्ते
शरद पवार यांच्या स्वागताला उपस्थित होते. शरद पवार यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
MP Srinivas Patil | शरद पवार हे नास्तिक नाहीत, खासदार श्रीनिवास पाटलांकडून आरोपांचं खंडन