नितीन गडकरींच्या ‘त्या’ विधानावर शरद पवार बोलले, म्हणाले…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. कधीकधी तुम्हाला वाटतं की तुम्ही मॅच हारत आहात, मात्र निकाल पूर्णपणे वेगळा लागतो, असं गडकरी म्हणाले होते. त्यांच्या या वक्त्यव्यावर मी क्रिकेटमध्ये प्रशासक होतो, मी क्रिकेट खेळत नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘स्थिर सरकार यावं ही आमची सर्वांची इच्छा आहे. राज्यात मध्यवर्ती निवडणुका होणार नाहीत. राज्यातील एकसूत्री कार्यक्रम ठरवण्यावर सध्या चर्चा सुरू आहेत. सध्या फॉर्म्युलावरही चर्चा सुरू असून ती प्राथमिक टप्प्यात आहे. ज्यावेळी त्यावर काही ठोस निर्णय होईल, त्यावेळी फॉर्म्युला सर्वासमोर उघड केला जाईल. राज्यात स्थिर सरकारच स्थापन होईल, हे सरकार पाच वर्ष चालेल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.’

थोरातांचीही गडकरींवर टीका –

राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. गडकरींच्या या वक्त्यव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही टीका केली आहे. गडकरी आमचे मित्र आहेत पण क्रिकेट आणि राजकारणात फरक आहे, क्रिकेट मध्ये बॉल दिसत असतो पण भाजपला बॉल दिसला नाही असा खोचक टोला बाळासाहेब थोरात यांनी गडकरींना लगावला आहे.

Visit : Policenama.com