NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांचे सूचक विधान, म्हणाले-‘राष्ट्रवादीचा संस्थापक कोण आहे ते…’

जुन्नर/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Chief Sharad Pawar | महाराष्ट्रात आणि बाहेर सुद्धा राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पक्षाचा संस्थापक कोण आहे ते सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे लोकांची भावना ही अनुकूल आहे, असे आमचे लोक सांगतात त्यामध्ये तथ्य आहे, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी केले आहे. ते रविवारी जुन्नर येथे बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवार गटावर (Ajit Pawar Group) निशाणा साधला. ते म्हणाले, कोणी वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा लोकशाहीमधील अधिकार आहे. त्यावर मी भाष्य करु इच्छित नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार की अजित पवार यावरुन पक्षातील दोन गटात वाद सुरु आहे. अजित पवार गटाने अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा केला आहे. यादरम्यान शरद पवार यांनी जुन्नर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत यावर सूचक भाष्य केले आहे.

जुन्नरमध्ये राष्ट्रावादी कोणाची यावर बोलताना शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले, मी महाराष्ट्रात फिरत आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये स्वच्छ कल्पना आहे. सामन्य लोक काय विचार करतो हे महत्त्वाचे आहे. शनिवारी किल्लारीला गेलो होतो. त्याठिकाणी वीस हजार लोकं होती. राज्यात सगळीकडे हेच चित्र बघायला मिळत आहे.
वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा लोकशाहीमधील अधिकार आहे त्यावर मी भाष्य करणार नाही.

आगामी निवडणुकीत जुन्नरचा राष्ट्रवादीचा चेहरा कोण असेल? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला.
यावर उत्तर देताना ते म्हणाले, निवडणूकांना अजून वेळ आहे.
जुन्नर तालुक्यातील लोकांसर्भात माझा अनेक वर्षांतील अनुभव आहे.
ते सहसा माझ्या शब्दाला कधी नकार देत नाहीत, असेही शरद पवार यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supriya Sule On Praful Patel | ‘माझ्यामुळे पक्षाला अपयश मिळालं असेल तर…’, सुप्रिया सुळेंचा प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल