NCP Chief Sharad Pawar Resigns | शरद पवारांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीनं फेटाळला, पुढं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष (Video)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Chief Sharad Pawar Resigns | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन अध्यक्षाच्या निवडीसाठी एका समितीची घोषणा केली होती. मात्र, आज (दि. 5 मे) मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयामध्ये या समितीची बैठक झाली आणि त्यामध्ये शरद पवार यांचा राजीनामा एकमताने फेटाळण्यात आला आहे. (NCP Chief Sharad Pawar Resigns)

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी हा राजीनामा फेटाळण्याचा प्रस्ताव समितीच्या समोर ठेवला होता. समितीमधील सर्वच सदस्यांनी एकमताने राजीनामा फेटाळण्याच्या प्रस्तावास मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार आहे शरद पवार नेमकी काय भुमिका घेणार याकडे सगळयांचेच लक्ष लागले आहे.

समितीची बैठक पार पडल्यानंतर निर्णयाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. प्रफुल्ल पटेल (Praful Patel)
याबाबत म्हणाले की, शरद पवार हे त्यांचा निर्णय पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात जाहीर करतील याबाबत
कोणलाही कल्पना नव्हती. यशवंतराव चव्हाण सभागृहात ज्येष्ठ नेत्यांसह आमदार, पदाधिकारी आणि
काही कार्यकर्त्यांनी आपली भावना व्यक्त केली. पक्षामधील ज्येष्ठ नेत्यांनी शरद पवार यांची भेट देखील घेतली.
शरद पवारांना अनेकांनी विनंती केली, मी ही विनंती करत राहिलो. देशाला, राज्याला आणि पक्षाला तुमची गरज आहे, अशी विनंती केली.

शरद पवार यांनीच नेमलेल्या समितीने त्यांची वेळोवळी भेट घेतली आहे.
आज समितीची बैठक घेऊन त्यांचा राजीनामा फेटाळण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
शरद पवार यांनीच अध्यक्ष म्हणून रहावं अशी विनंती आम्ही करतो असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हंटलं आहे.

Web Title :-  NCP Chief Sharad Pawar Resigns | ncp core committee reject resignation of sharad pawar as party chief Praful Patel

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Mahavitaran News | प्रतिसाद वाढल्याने छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांना आणखी वेग द्या – मुख्य अभियंता राजेंद्र पवार

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात रोखला दुसरा बालविवाह