शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंचे भावनिक ट्विट, म्हणतात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज ८० वर्षाचे होताहेत. त्यामुळे मुंबईतील त्यांच्या घरी आज कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पहायला मिळते. संपूर्ण राज्यातून कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानी जमा झाल्याचे पहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आजचा दिवस बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक भावनिक ट्विट करत आपल्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये त्या म्हणतात, “प्रिय बाबा, तुम्ही आमच्यासाठी अखंड उर्जेचा स्रोत आहात. तुम्ही आम्हाला विचारांचा उज्ज्वल वारसा दिला आणि त्यानुसार मार्गक्रमण करण्याचं बळ देखील… बाबा, तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा. तुम्हाला निरोगी असे दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.” अशा प्रकारचे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

तर राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटरवरून आज ‘बळीराजा कृतज्ञता दिन’ असा उल्लेख करण्यात आलेला आहे. आजच्या दिवसानिमित्त शरद पवार सकाळ पासून ते दुपारपर्यंत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कार्यकर्त्यांना भेटणार आहेत.

८० वर्षाचे असूनही आजही शरद पवारांचा राजकारणात दबदबा आहे. एवढेच काय पण सध्या राज्यात असलेल्या महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांची मोठी भूमिका आहे. त्यामुळे आजही पवारांना राजकारणातील किंगमेकर समजले जाते.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/