‘ऑपरेशन लोटस’ राबवण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरु आहे : शरद पवार

पोलिसनामा ऑनलाईन – भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस राबवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या भाषणात सांगतात की सरकार पाडण्याचा आमचा विचार नाही. मात्र पडद्याआडून भाजपकडून ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न केला आज असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार असून थोडेफार मतभेद जरुर आहेत. मात्र भाजपविरोधात आम्ही तिन्ही पक्ष म्हणून एकत्र आलो आहोत. आमच्या सरकारला काहीही धोका नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आत्तापर्यंत मी मे महिन्यात हे सरकार पाडले जाईल असे ऐकले होते. त्यानंतर जुलै महिन्याची मुदत देण्यात आली. आता ऑक्टोबरची मुदत दिली जाते आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारला काहीही धोका नाही. आमचे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, कोरोना महामारीचे संकट फक्त महाराष्ट्र किंवा भारतावर नाही हे संकट संपूर्ण जगावर आले आहे. अमेरिकेत जे काही बळी गेले आहेत त्यापेक्षा भारतातले प्रमाण नक्कीच कमी आहे असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.