NCP Chief Sharad Pawar | गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवा, नांदेड खून प्रकरणावर शरद पवारांची संतप्त प्रतिक्रिया (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नांदेडच्या बोंढार हवेली गावातील (Nanded Bondhar Haveli Murder Case) बौद्ध तरुण (Buddhist) अक्षय भालेरावच्या (Akshay Bhalerao) खून प्रकरणाने राज्यात संतापाची लाट आहे. गावात भीम जयंती कशी काय साजरी केली? असा प्रश्न विचारुन आणि त्याचा राग मनात ठेवून गावातील सवर्णांनी अक्षयची हत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. या घटनेबाबत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला आहे. आरोपींना त्यांची जागा दाखवा असे शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले. या प्रकरणात 9 जणांवर अॅट्रॉसिटीचा (Atrocity Act) गुन्हा दाखल करुन 7 जणांना अटक (Arrest) केली आहे.

 

 

सखोल चौकशी करा

नांदेडची घटना अत्यंत निंदनीय आहे. ही घटना महाराष्ट्राला शोभणारी नाही, असं सांगतानाच राज्य सरकारने या घटनेच्या खोलात जाऊन जे कुणी गुन्हेगार असतील त्यांना त्यांची जागा दाखवावी. सरकारने या खून प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी केली आहे. कुस्तीगीर परिषदेची बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

 

त्यावेळी लालबहादूर शास्त्रींनी राजीनामा दिला होता

Advt.

ओडिशातील भीषण रेल्वे अपघातात (Odisha Train Accident) आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो प्रवाशी जखमी झाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी देशाचे माजी रेल्वमंत्री लालबहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, मला आठवते की लालबहादुर शास्त्री रेल्वेचे मंत्री असताना दोन अपघात झाले. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Former PM Jawaharlal Nehru) राजीनाम्याच्या विरोधात होते. असं असूनही लालबहादूर शास्त्रींनी ही माझी नैतिक जबाबदारी आहे, मी या पदावर राहू इच्छित नाही, असं सांगत राजीनामा दिला.

 

आता लालबहादूर शास्त्रींचे उदाहरण देशासमोर आहे. आत्ताच्या राज्यकर्त्यांनी त्यांना योग्य वाटेल ते कराव,
असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं. तसेच रेल्वे अपघाताची चौकशी व्हावी अशी सर्वांनी मागणी केली आहे.
या चौकशीतून सत्य समोर येईल. त्यानंतरच पुढे काही सुचवता येईल, असेही पवार म्हणाले.

 

 

Web Title :  NCP Chief Sharad Pawar | sharad pawar demand shinde fadanvis government should investigate nanded akshay bhalerao murder case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा