NCP Chief Sharad Pawar | संसदेत राष्ट्रवादी ‘आप’च्या पाठीशी, केजरीवालांच्या भेटीनंतर शरद पवारांचे आश्वासन; म्हणाले-‘हा प्रश्न दिल्लीचा नाही तर…’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann) हे सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतल्यानंतर आज राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी दिल्ली सरकारच्या अधिकारांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी पक्ष अरविंद केजरीवाल यांच्यासोबत असल्याचे सांगत केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार निशाणा साधला आहे.

 

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले, आजची पत्रकार परिषद महत्त्वाची आहे. देशासमोर एक नवा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न केवळ दिल्लीचा नाही, तर संसदीय लोकशाहीच्या संरक्षणाचा (Parliamentary Democracy) प्रश्न आहे. दिल्लीत थेट संसदीय लोकशाहीवरच आघात होत आहे. लोकशाहीत निवडून आलेलं सरकार निर्णय घेते. नियुक्त केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वापर करुन लोकनियुक्त सरकारकडे दुर्लक्ष केलं जात आहे. हा प्रश्न सर्वांसमोर आहे. त्यामुळे हा मुद्दा लोकशाही वाचवण्याचा आहे.

 

https://twitter.com/AamAadmiParty/status/1661683690584559617?s=20

 

आज लोकशाही वाचवण्याची वेळ आहे

शरद पवार पुढे म्हणाले, आज दिल्लीत कोणतं सरकार आहे यावर भांडण्याची वेळ नाही. आज लोकशाही वाचवण्याची वेळ नाही. आज लोकशाही वाचवण्याची वेळ आहे. सामान्य लोकांचं मत घेऊन आपलं सरकार स्थापन करण्याचा अधिकार वाचवण्यासाठी आज अरविंद केजरीवाल, भगवंत मान या ठिकाणी आले आहेत. त्या मुद्यावर त्यांनी पाठिंबा मागितला आहे. माझ्यासह माझा पक्ष आणि महाराष्ट्राची जनता याला नक्कीच पाठिंबा देईल, असं शरद पवार म्हणाले.

 

https://twitter.com/PawarSpeaks/status/1661689940240113666?s=20

 

इतर नेत्यांचा पाठिंबा मिळवण्याच प्रयत्न करु

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वत: पूर्ण मदत करेनच, तसेच देशातील इतर नेत्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
मला संसदेत येऊन सलग 56 वर्षे झाली आहेत. त्यामुळे याचा एक फायदा होतो तो म्हणजे देशातील कोणत्याही राज्यात गेलं
तरी तिथं कोणताही नेता किंवा खासदार यांच्याशी व्यक्तिगत संबंध आहेत. अनेकांसोबत मी काम केलं असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

 

 

 

Web Title :  NCP Chief Sharad Pawar | sharad pawar first reaction after meeting with arvind kejriwal bhagwant mann

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा