NCP Chief Sharad Pawar | शरद पवार अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर आले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे पहिल्यांदाच वर्षा बंगल्यावर आले आहेत. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे (Thackeray group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे परदेशात असताना शरद पवार वर्षा बंगल्यावर शिंदे यांच्या भेटीसाठी गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

 

एकीकडे महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) जागावाटपाच्या चर्चा सुरु आहेत, तर दुसरीकडे शिंदेंची शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्येही (BJP) जागावाटपावरुन चर्चा होत आहेत. त्यातच शरद पवार हे अचानक एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहोचले आहेत. या भेटीमागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

 

व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा

 

दरम्यान, मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात भेटीगाठी वाढल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray)
यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाली. मात्र ही भेट अराजकीय असल्याचे फडणवीसांनी सांगितले होते.

 

 

Advt.

Web Title :  NCP Chief Sharad Pawar | Sharad Pawar Meet CM Eknath Shinde at varsha bungalow

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MP Gajanan Kirtikar | मी असं म्हणालोच नाही, सापत्न वागणुकीवरुन गजानन कीर्तिकर यांचा यू-टर्न

Navi Mumbai Property Tax | नवी मुंबईतील घरांना मालमत्ता कर माफी देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा;
ऐरोली आणि बेलापूर मतदार संघातील विकासकामांचा CM एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा

Police Viral Video | समृद्धी महामार्गावर पोलिसांची ‘समृद्धी’, पोलिसांच्या वसुलीचा व्हिडिओ दानवेंकडून ट्विट