NCP Chief Sharad Pawar | निवडणुका कधी होणार? शरद पवारांनी सांगितली तारीख, कार्य़कर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना

NCP Chief Sharad Pawar | sharad pawar predicts election dates in ncp meeting 
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत (Local Bodies Election) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी मोठं विधान केले आहे. मे महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात असे त्यांनी म्हटले आहे. शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत हे विधान केले आहे. पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर (Pradeep Gartkar) यांनी याबाबत माहिती दिली.

 

मे महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावं, असे आदेश शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिले आहेत. शरद पवार गुरुवारी पुण्यात आले होते. त्यांनी तालुका निहाय बैठक घेतल्या.

 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे मिनी विधानसभा निवडणूक (Mini Assembly Elections) म्हणून पाहिले जाते. परंतु प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्यावरुन निवडणुका वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात (Supreme Court) असून त्याच्यावर निर्णय झाल्यानंतर निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे.

 

राज्यातील सर्व महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकींची प्रभाग रचना नव्याने होणार आहे.
एकीकडे राज्य सरकारने नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले
असतानाच दुसरीकडे ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रलंबित निवडणुका
त्वरित घेण्याची विनंती करणारी याचिका सुप्रीम कोर्टात आहे.

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | sharad pawar predicts election dates in ncp meeting

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Budget 2023 | अर्थमंत्री सीतारामन मध्यमवर्गीयांना देऊ शकतात मोठी भेट, टॅक्स सवलत मर्यादा वाढवण्यावर विचार

Nana Patole | ‘मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी योगी आदित्यनाथांना पायघड्या’ – नाना पटोले

Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला; म्हणाले, ‘आपल्याकडे एक सीएम तर दुसरे…’

Total
0
Shares
Related Posts
Maharashtra Assembly Election 2024 | sanjeevraje naik nimbalkar and deepak chavan join sharad pawar group ramraje nimbalkar not campaign for mahayuti

Maharashtra Assembly Election 2024 | फलटणच्या राजकारणात मोठ्या घडामोडी ! संजीवराजेंसह आमदार दीपक चव्हाण शरद पवार गटात प्रवेश करणार; रामराजेंचा मात्र वेगळा निर्णय; म्हणाले – ‘भाजपच्या विचारसरणीशी भांडण नाही पण …’