NCP Chief Sharad Pawar | कोल्हापुरातील घटनेवरुन शरद पवारांचा गंभीर आरोप, म्हणाले- ‘अशा प्रवृत्तींना सत्ताधारी…’

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शिवराज्याभिषेक दिनी (Shivrajyabhishek Din ) कोल्हापुरात आक्षेपार्ह व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवण्यात आल्यानंतर जातीय तणाव निर्माण झाला आहे. या प्रकारानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी अशा प्रवृत्तींना सत्ताधारी प्रोत्साहन देतात, असा गंभीर आरोप केला आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलत होते. तसेच लगेच रस्त्यावर उतरुन त्याला धार्मिक स्वरुप देणं योग्य नाही. सत्ताधारी लोकच रस्त्यावर उतरणे योग्य नाही. यामुळे दोन समाजात कटुता निर्माण होते आणि हे चांगलं लक्षण नसल्याचे शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले.

सत्ताधारी धार्मिक मुद्यांना प्रोत्साहित करत आहेत

काही लोक जाणीवपूर्वक भेदभाव करत आहेत. धार्मिक मुद्यांना सत्ताधारी प्रोत्साहित करत आहेत. कोल्हापुरात (Kolhapur News) सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या घटनेनंतर अशांततेची परिस्थिती आहे. सत्ताधारी पक्ष दंगलीसारख्या गोष्टीला प्रोत्साहित करत आहेत. मोबाईलवर कोणी चुकीचा मेसेज पाठवला असला, तरी त्यासाठी रस्त्यावर उतरुन धार्मिक स्वरुप देण्याची गरज नाही, असे शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले.

अहिंसेतून कटुता निर्माण झाली तर

शरद पवार पुढे म्हणाले, राज्यात शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे, मात्र त्यांच्याशी संलग्न लोक रस्त्यावर उतरु लागले, अहिंसेतून कटुता निर्माण झाली तर ते बरोबर नाही. जे घडत आहे ते एकट्याचे काम नाही, त्यामागे विचारधारा आहे. अशा घटना घडतच आहेत. त्यामुळे लहान घटकांना संरक्षण देत कोणी कायदा हातात घेत असल्यास कारवाई करणे सरकाचे काम आहे.

इतर ठिकाणी दंगल करण्याचं काय कारण?

Advt.

राज्यात सातत्याने घडणाऱ्या धार्मिक दंगलीवर (Religious Riots) भाष्य करताना शरद पवार म्हणाले,
राज्यात सातत्याने दंगली घडत आहेत. धार्मिक दंगली मर्यादित भागात झाल्यास चिंतेचा विषय नाही.
पण असे प्रकार घडत नाहीत तर ते घडवले जात आहेत.
काल एका वृत्तवाहिनीवर पाहिलं की कोणीतरी गर्दीत औरंगजेबाचा फोटो दाखवतोय.
आता या गोष्टीसाठी इतर ठिकाणी दंगल करण्याचं काय कारण? यासाठी पुण्यात आंदोलनाची काय गरज आहे?
असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Web Title :  NCP Chief Sharad Pawar | sharad pawar reaction on aurangzeb poster in ahmednagar Kolhapur Protest News

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Weather Update | मॉन्सून पुन्हा लांबणीवर; महाराष्ट्रात 16 जूनपर्यंत पावसाची शक्यता

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचा भाव

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलिस स्टेशन – अपघातामुळे बनावट नंबर प्लेट लावून फिरणारा कारचालक सापडला