NCP Chief Sharad Pawar | ‘फडणवीसांनी नंबर दोनची जागा आनंदाने स्वीकारल्यासारखं वाटत नाही, त्यांचा चेहरा…’, शरद पवारांनी डिवचलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (BJP Leader Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असे वाटले होते. मात्र, दुपारी पत्रकार परिषदेत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Shivsena Rebel Leader Eknath Shinde) हे मुख्यमंत्रीपदाची (Chief Minister) शपथ घेतील असे घोषित केले. यानंतर भाजपच्या केंद्रीय कमिटीने दिलेल्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) पदाची शपथ घ्यावी लागली. यासर्व घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिय देताना फडणवीसांना डिवचलं. देवेंद्र फडणवीस यांनी नाराज मनाने उपमुख्यमंत्रीपद स्विकारल्यासारखं वाटत नाही असं शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले.

 

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ आगदी ऐनवेळी घेतल्यासंदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले, फडणवीस यांनी नंबर दोनची जागा आनंदाने स्वीकारली आहे असं वाटत नाही. त्यांचा चेहरा तसं सांगत नाही. पण ते नागपुरचे आहेत. एकदा आदेश आला की तो पाळायचा असतो, हे कारण असावे दुसरे कारण नसावे, असे पवार म्हणाले.

 

फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री होते. त्यानंतर अडीच वर्षे विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. तरीही त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. हा तर आश्चर्याचा धक्का आहे. पण एकदा आदेश झाला की त्यामध्ये तजजोड नाही. पण एकदा आदेश झाला आणि सत्तेची कोणतीही संधी मिळाली की ती स्वीकारायची असते याचं उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी घालून दिलं आहे, असेही शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले.

 

शरद पवार पुढे म्हणाले, राज्यातील विधानसभेचे 38-39 सदस्य आसाममध्ये गेले होते. त्यामध्ये राज्याचं नेतृत्व बदलाची आणि कुणालातरी मुख्यमंत्रिपदावर काम करण्याची संधी मिळावी, अशी मागणी असावी. भाजपमध्ये एकदा आदेश झाला की, मग तो दिल्लीचा असेल किंवा नागपूरचा आला असेल तर त्यामध्ये तडजोड नसते. त्यामुळे आदेश आला आणि राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी शिंदे यांच्यावर पडली. याची कल्पना कदाचित एकनाथ शिंदे यांनाही नसावी.

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून कुठे कमी पडलो नाही.
एकनाथ शिंदे हे त्यांच्या लोकांना बाहेर न्यायला प्रभावी ठरले. एवढ्या लोकांना बाहेर नेण्याची हिंमत दाखवली यातच त्यांचे यश आहे,
असं पवार यांनी शिंदे यांच्या बंडाबद्दल बोलताना म्हणाले.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केली जात असल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले,
माझ्या मते त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये एकदा विश्वास टाकला की पूर्ण जबाबदारी घ्यायची.
विधीमंडळाची पुर्ण जबाबदारी ही एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाकरे यांनी दिली होती.
ज्या वेळेला 39 लोकं राज्याच्या बाहेर जातात त्यात दुरुस्त करायला स्कोप राहत नाही, असेही पवार म्हणाले.

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | sharad pawar says devendra fadnavis was not happy accepting to be deputy cm

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Changes From July 1 | क्रिप्टोकरन्सी, पॅन-आधार लिंक, प्लास्टिक बॅन आणि नवीन कामगार कायदा…जाणून घ्या 1 जुलैपासून होणार कोण-कोणते बदल

 

Eknath Shinde CM |  … म्हणून भाजपने एकनाथ शिंदेंच्या हाती दिली सत्तेची सूत्रं, ‘ही’ आहेत 4 कारणे

 

Gold Silver Price Today | सोने 51 हजारच्या खाली आले, चांदीत झाली मोठी घसरण, जाणून घ्या नवीन दर