NCP Chief Sharad Pawar | भाजपच्या माघारीनंतर शरद पवार पहिल्यांदाच प्रसार माध्यमांसमोर बोलले, म्हणाले- ‘माझी भाजपकडे मागणी नव्हती, तर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरी पूर्व येथे होणारी पोटनिवडणूक (Andheri By Election) बिनविरोध करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. भाजपचे (BJP) उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांना उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी पक्षादेश देखील आला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय जनता पक्षाने माझे ऐकले, ही चांगली गोष्ट आहे, असे शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले.

 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून भाजपचा उमेदवार मागे घेण्याची विनंती केली होती. तसेच शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी देखील ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सर्वच पक्षांना आवाहन केले होते. त्यावर अखेर भाजपने आपला अधिकृत उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नागपूरात पत्रकार परिषद घेऊन भाजप या निवडणुकीतून यशस्वी माघार घेत असल्याचे स्पष्ट केले.

यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एक जरी पक्ष राहिला तर निवडणूक होईल. माझी भाजपकडे मागणी नव्हती, तर सल्ला होता.
कोणच्याही सांगण्याने हे झाले असेल तर त्याला माझी हरकत नाही.
जे गृहस्थ गेले त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली तर अश्या प्रकारची पोटनिवडणूक आपण बिनविरोध करतो.
मात्र, हे निर्णय लवकर होत नसतात. त्याला वेळ लागतो. एमसीए (Mumbai Cricket Association)
असुदे किंवा अनेक निवडणुका असुदे, मी अनेक वर्षे राजकारणात आहे.
मी त्याठिकाणी उभा नाही. आता जे अर्ज बाकी आहेत, ते कोण आहेत, ते आम्हाला माहित आहे.
त्यामुळे मी पुन्हा आवाहन करणार नाही, असे शरद पवार म्हणाले.

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | sharad pawars first reaction after bjp withdrew from the andheri assembly by election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | भाजपला उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अन्यथा त्यांना…, जयंत पाटलांचा भाजपला टोला

Sanjay Raut | राज ठाकरेंचे भाजपला दिलेले पत्र हा केवळ स्क्रिप्टचा भाग, संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

Mandakini Khadse | जळगाव दूध संघातील अपहार प्रकरणात खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर गुन्हा दाखल