NCP Chief Sharad Pawar | पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अचानक शरद पवारांची एन्ट्री!

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Chief Sharad Pawar | विधान भवन (Vidhan Bhavan) येथे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक (Pune District Planning Committee Meeting) चालू आहे. या बैठकीमध्ये अचानक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी एन्ट्री केल्याने सगळे अवाक झाले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. (NCP Chief Sharad Pawar)

दुपारी एक वाजता पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात झाली. जिल्ह्याचा विकास आराखडा नीट अंमलात आणण्यासाठी घेण्यात येणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule), खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe), आमदार चेतन तुपे (MLA Chetan Tupe), आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre), आमदार सुनील शेळके (MLA Sunil Shelke), आमदार दत्तात्रय भरणे (MLA Dattatray Bharne), शिंदे गटाचे नेते माजी मंत्री विजय शिवतरे (Vijay Sivatare), भाजपचे नेते माजी मंत्री बाळा भेगडे (Bala Bhegde) यांच्यासह अधिकारी उपस्थित आहे. मात्र अचानक राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीस हजेरी लावली.

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागील अनेक वर्षांपासून सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये
अनेक मुद्द्यांवरून खटके उडत होते. मात्र यावर्षी खासदार शरद पवार यांनी अनेक वर्षानंतर स्वत:हून बैठकीस
हजेरी लावल्याने अनेक मुद्दे व कामे मार्गी लागतील अशी आशा आहे.
राज्यात झालेल्या सत्तांत्तराच्या घडामोडीनंतर पहिल्यांदाच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत
तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदार संघात
(Baramati Assembly Constituency) नेलेल्या विकास निधीला (Development Fund)
विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नकार दिल्याने वाद सुरू झाले होते.
त्यामुळे आजच्या होणाऱ्या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (NCP Chief Sharad Pawar)

Web Title : NCP Chief Sharad Pawar | Sharad Pawar’s sudden entry in the Pune District Planning Committee meeting!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘तेढ निर्माण होईल असं काही बोलू नका’, काँग्रेसच्या बड्या नेत्यानं संजय राऊतांना सुनावलं

Sushma Andhare | ‘….तर आप्पासाहेब जाधव परत गेले असते का’, जाधव यांच्या दाव्यावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

Pune Railway Station News | पुणे रेल्वे स्थानकावर निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ व पाणी बॉटल विकणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाईचा दणका