NCP Chief Sharad Pawar | पवारांच्या इशाऱ्याला ४८ तास उलटल्यानंतर युतीच्या दोन नेत्यांकडून शरद पवारांवर निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Shital Mhatre) यांनी ट्विट करून नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना टोला लगावला आहे. तसेच भाजप नेते नीलेश राणे यांनीही शरद पवारांना (Sharad Pawar) डिवचले आहे. काही दिवसांपासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्‍नावरून महाराष्ट्रात वातावरण चांगलेच तापले आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या या वादाने आक्राळविक्राळ स्वरूप घेतले आहे.

मंगळवारी (दि.६) बेळगाव-हिरेबागेवाडी येथील टोल नाक्यावर ‘कन्नड रक्षण वेदिका संघटने’च्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या काही वाहनांवर दगडफेक केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्‍नावरून माध्यमांशी बोलताना कर्नाटक सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला इशारा दिला होता. ते म्हणाले होते, ‘कर्नाटकच्‍या मुख्‍यमंत्र्यांनी महाराष्‍ट्राच्‍या संयमाची परीक्षा बघू नये, कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायावर 48 तासांत मार्ग काढला नाही तर मी स्वतः बेळगावात जाईन.’ तसेच, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह, नेत्यांनी एकत्र येऊन यावर मार्ग काढावा, असे आवाहनही पवारांनी केले होते.

आता या इशाऱ्याला ४८ तास उलटून गेल्यानंतर शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी ट्विट करून
शरद पवारांना लक्ष्य केले. त्या ट्विटमध्ये लिहितात, “ते ४८ तासांत भेट द्यायला जाणार होते ना ?
की फक्त “कर नाटक”? तर भाजप नेते नीलेश राणे यांनीही ट्विट करत शरद पवारांना डिवचले आहे.
ते लिहितात, “ते पवार साहेब 48 तास थांबून महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात जाणार होते, त्याचं काय झालं??”

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | shital mhatre was he going to visit in 48 hours or just kar natak shital mhatres tweet

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Basavaraj Bommai | ‘महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही’ – बसवराज बोम्मई

Mumbai Ahmedabad Bullet Train | मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

Priyanka Chopra | अभिनेत्री प्रियंका चोप्राने जागतिक स्तरावर बॉलिवूडवर केलेले ‘ते’ वक्तव्य चर्चेत