NCP Chief Sharad Pawar | शिंदे गटाचं चाललंय काय? उदय सामंत, भरत गोगावले शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळे (Congress) आम्ही महाविकास आघाडीमधून बाहेर पडलो, असं सतत सांगणाऱ्या शिवसेनेच्या Shivsena (शिंदे गट-Shinde Group) नेत्यांनी शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर खापर फोडलं. मात्र, शुक्रवारी शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि शिवसेना प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawle) यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय (Maharashtra Politics News) चर्चांना उधाण आलं आहे.

शुक्रवारी (दि.31) दुपारी उद्योग मंत्री उदय सामंत आणि प्रतोद भरत गोगावले हे शरद पवार  यांच्या सिल्व्हर ओकवर पोहोचले. अचानक शिवसेनेचे नेते सिल्व्हर ओकवर आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेनेच्या दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली. या भेटीवेळी प्राध्यापक प्रदीप ढवळ (Professor Pradeep Dhawal)
हे देखील उपस्थित होते. ही भेट कशा संदर्भात होती याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.
त्यामुळे या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. या तिन्ही नेत्यांमध्ये कोणत्या मुद्यावर चर्चा झाली, याची माहिती मिळाली नाही.
शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती उदय सामंत यांनी ट्विट करुन दिली आहे.

Web Title :-  NCP Chief Sharad Pawar | shivsena eknath shinde uday samant bharat gogawale meets sharad pawar on silver oak

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amba Mahotsav Pune 2023 | ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजनेंतर्गत ‘आंबा महोत्सव’ 1 एप्रिलपासून

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांनी दोन दिवसात रोखला सलग दुसरा बालविवाह