मोदींच्या ‘या’ घोषणेचे काय झाले ? – शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राफेल डीलबद्दलची महत्त्वाची कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ‘ ना खाऊंगा ना खाने दूंगा ‘ तुमच्या या घोषणेचे काय झाले. असा सवालही त्यांनी केला.

आगामी लोकसभा – विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. दरम्यान सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान शरद पवार यांनीही मोदींच्या पावलावर पाऊल ठेऊन कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी, राफेल विमान खरेदी प्रकरणातील सरकारची भूमिका अस्वस्थ करणारी आहे. या संपूर्ण प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सर्व विरोधकांनी केली होती. मात्र सरकारने चौकशीस नकार दिला. असे शरद पवार यांनी म्हंटले

इतकेच नव्हे तर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ ही घोषणा दिली होती. तर त्या घोषणेचे काय झाले. असा सवालही त्यांनी केला.

विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयात  राफेल डील प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकांवर काल सुनावणी झाली. त्यावेळी महाधिवक्ता के.के. वेणुगोपाल यांनी डील संदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याची माहिती दिली. त्यावेळी, ‘द हिंदू’ वृत्तपत्राने पंतप्रधान कार्यालयाने  राफेल डीलमध्ये हस्तक्षेप करुन समांतर वाटाघाटी केल्याचे वृत्त काही गोपनीय कागदपत्रांच्या आधारे  दिले होते.  दरम्यान, ‘द हिंदू’नं ज्या कागदपत्रांच्या आधारे राफेल डीलबद्दलचे वृत्त दिले, ती कागदपत्रे सादर केल्यास देशाच्या सुरक्षेला धक्का पोहोचेल, असा दावा वेणुगोपाल यांनी केला. त्यानंतर, सरकारने न्यायालयाला चुकीची माहिती दिल्याचा गंभीर आरोप याचिकाकर्ते आणि वकील प्रशांत भूषण यांनी केल