Coronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी केली PM मोदींकडे ‘ही’ विशेष मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसने जगभरातील तब्बल 176 देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे. देशात देखील कोरना व्हायरचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे देशातील जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विशेष आवाहन केलं आहे.


शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे, जीएसटी परतावा करण्याची मुदत महाराष्ट्रात 22 मार्च रोजी संपत आहे. भारतातील इतर भागांमध्ये याच आसपास ही मुदत संपत आहे. तसेच आयकर भरण्याची तारीख देखील 31 मार्चला संपत आहे. कोरोना आणि त्यामुळे तयार झालेली लॉकडाऊनची स्थिती लक्षात घेत आपण सर्व प्रकारचा परतावा भरण्याची मुदत किमान एक महिन्याने वाढवावी. तसेच यासाठी कोणत्याही प्रकराचा दंड करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

भारतातील संख्या वेगाने वाढली !
भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून मागील 24 तासात 98 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने कोरोनाबाधितांची संख्या 299 वर पोहचली आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मागील 24 तासात कोरोनाचे 11 रुग्ण आढळून आले असून महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 63 वर पोहचली आहे. मागील 24 तासात मुंबईत 10 तर पुण्यात 1 रुग्ण आढळून आला आहे.