NCP Chief Sharad Pawar | पवारांना धमकी देणाऱ्याला तात्काळ अटक करुन तुरुंगात टाका, चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी (व्हिडिओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरुन जीवे मारण्याची धमकी (Death Threats) दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘तुमचा दाभोळकर होणार’ अशी धमकी ट्विटद्वारे शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना देण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यासारख्या व्यक्तीला धमकी देणाऱ्याला तात्काळ अटक करुन तुरुंगात टाकले पाहिजे. पवारांसारख्या वरिष्ठ नेतृत्वाला धमकी देणे योग्य नाही. राज्य सरकारकडून (State Government) योग्य कारवाई करण्यात यावी, असे बावनकुळे म्हणाले. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

 

 

बावनकुळे पुढे म्हणाले, धमकी देणारा कोणत्याही पक्षाचा असला तरी ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असा प्रकार करणाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असेही बावनकुळे म्हणाले. तसेच ज्याने कुणी हे केलं आहे त्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सक्षम आहेत. आमचं सरकार सक्षम आहे ते कारवाई करतील.

 

Advt.

यावेळी बोलताना बावनकुळे यांनी राष्ट्रवादीच्या (NCP) धोरणांवर टीका केली.
राष्ट्रवादीची स्थापना किंवा शरद पवार यांच्या राजकीय जीवनाचा विचार केला
तर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) वगळता कुठल्याही ओबीसीला (OBC) मानाचे स्थान मिळाले नाही.
विदर्भात येऊन राष्ट्रवादी दोन दिवसांचे शिबीर घेत असताना त्यात ठराव होतील.
राष्ट्रवादीचे अध्यक्षपद किंवा प्रदेशाध्यक्षपद ओबीसीला देतील असं वाटलं होतं.
मात्र, नागपुरच्या अधिवेशनात देखील यासंदर्भात पुढाकार घेतला नाही.
हे अधिवेशन म्हणजे केवळ दिखावाच होता, असा आरोप बावनकुळे यांनी केला.

 

 

 

Web Title :  JSB Bank Ltd | Kishor Bhagwan Tarwade unopposed as Director of Jaibhavani Sahakari Bank Ltd

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा