home page top 1

राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह ‘या’ गँगचा प्रमुख ‘एमपीडीए’नुसार स्थानबद्ध

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक समद वहाब खान, (वय- ४७ वर्षे, रा. मुकुंदनगर, अहमदनगर) व अंडा गँगचा प्रमुख शेहबाज उर्फ बाबा उर्फ बाबा अंडा जाफर खान (वय- ३२ वर्षे रा. मुकुंदनगर, अहमदनगर) या दोघांविरुद्ध ‘एमपीडीए’ नुसार कारवाई करण्यात आली असून, त्या दोघांना एक वर्षासाठी त स्थानबद्ध करण्यात येणार आहे. आज रात्री या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस अधिक्षक ईशू सिंधू यांनी जिल्ह्यातील वाळू तस्कर, अवैध धंदे करणारे व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यांच्याविरुध्द कडक कारवाई करण्याचे संकेत दिलेले होते. त्या अनुषंगाने धोकादायक व्यक्ती इसम समद वहाब खान (वय- ४७ वर्षे, रा. मुकुंदनगर, अहमदनगर), शेहबाज उर्फ बाबा उर्फ बाबा अंडा जाफर खान (वय- ३२ वर्षे, रा. सदर) यांचेविरुध्द ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत पाठविलेल्या प्रस्तावावर जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी अंतिम निर्णय घेतला. दोन्हीही धोकादायक इसमांना एक वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश आज पारित केले आहेत.

त्यानुसार दोघांना पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांचे आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेऊन एक वर्षाकरीता नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे स्थानबध्द करण्यात आले आहे. स्थानबध्द करण्यात आलेला धोकादायक नगरसेवक समद वहाब खान याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे ३, तर शेहबाज उर्फ बाबा उर्फ बाबा अंडा जाफर खान याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार कलम ४/२५ सदर प्रस्ताव सादर करुन स्थानबद्ध इसमांना स्थानबध्द केले.

अपर पोलिस सागर पाटील, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, स.फौ. मधुकर शिंदे, पो. कॉ. किरण जाधव, पो. कॉ. सूरज वाबळे, भिंगार कँप सपोनि/राजपूत व महीला पोसई/वैशाली गायकवाड यांनी सदरच्या कारवाईमध्ये मदत केलेली आहे.

Loading...
You might also like