नगरमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – गणेशोत्सव व मोहरम काळासाठी शहरबंदी असलेला राष्ट्रवादीचा नगरसेवक समद वहाब खान हा पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी फरार होता. तो आज घरी येणार असल्याची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

शहरबंदी असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक समद वहाब खान पोलिसांना शहरात आढळून आला होता. नगरसेवक खान याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करत तो पसार झाला होता. याप्रकरणी भिगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नगरसेवक समद खान हा आज सकाळी मुकुंदनगर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून त्याला भिंगार पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांना धक्काबुक्की करून पळून गेल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला सरकारी कामात अडथळा आणणे, आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. गणेशोत्सव व मोहरमच्या काळात शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून गुन्हेगारी पार्श्वभूमी
असलेल्या साडेतीनशेहून अधिक जणांना सहा दिवसांसाठी शहरबंदी करण्यात आली आहे. शहरबंदी असलेली व्यक्ती शहर सोडून गेली की नाही हे पाहण्यासाठी भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी, कर्मचारी अजय नगरे हे मुकुंदनगर येथे गेले होते. त्यावेळी पोलिसांना धक्काबुक्की झाली होती.

Visit : Policenama.com

तुमच्या मुलांच्या डोळ्यांची अशी घ्या काळजी, उपाय जाणून घ्या
जाणून घ्या ‘सेक्शुअल लाइफ’ असंतुष्ट असण्याची कारणे, अशी घ्या काळजी
चिंच आहे बहुगुणी, उन्हाचा कडाका वाढला तर आवश्य खा

शरीरात ‘या’ ठिकाणी लपतो ‘एड्स’चा व्हायरस, संशोधकांनी केला दावा
मधुमेहाचे औषध स्तनाच्या कॅन्सरवर उपयुक्त, चिनी संशोधकांचे मत
मुलांना कोणत्या वयात शाळेत घालावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
ऑफिसमध्ये जेवण करताना घ्यावी ‘ही’ काळजी, तुमच्यासाठी ठरु शकते फायदेशीर
नाभीवर लावा २ थेंब दारु, दूर होतील पीरियड्ससंबंधीत ‘या’ समस्या, जाणून घ्या