राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून मान्यता जाणार ? आयोगाची नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूकीत दारूण पराभव झाल्यानंतर देशातील अनेक राजकीय पक्षांना धक्का बसला आहे. लोकसभेत धक्कादायक पराभव झाल्यानंतर निवडणूक आयोगाने आता काही राजकीय पक्षांना धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने अनेक राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून टाकण्याची नोटीस दिली आहे.

राजकीय पक्षापैंकी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. राष्ट्रवादी पक्षाबरोबरच देशातील तृणमूल आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षालाही आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढण्याची नोटीस दिली आहे. निवडणूकीत लोकांनी धक्का दिल्यानंतर निवडणूकीनंतर आयोगाने राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीसह इतर पक्षांना नोटीस पाठवून २० दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. उत्तर न आल्यास राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेच्या निवडणूक धक्का बसला होता. राज्यात दोन्ही पक्षाच्या केवळ पाच जागी विजय झाला होता. निवडणूक आयोगाने सध्या देशातल्या सात पक्षांना राष्ट्रीय पक्षांचा दर्जा दिला आहे.

या ७ पक्षांना आहे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा

भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

Loading...
You might also like