NCP Crisis | निवडणूक आयोगाने एकांगी निर्णय घेतला, शरद पवार गटाचा आरोप; पुढील सुनावणी ‘या’ तारखेला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – NCP Crisis | निवडणूक आयोगाने (Election Commission) एकांगी निर्णय घेत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) केला आहे. शरद पवार गटाने वकिलांमार्फत निवडणूक आयोगासमोर आपली भूमिका मांडली आहे. विधिमंडळ पक्ष आणि मूळ पक्ष वेगळा असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP Crisis) फूट असल्याचे मान्य कसे केले? असा सावाल यावेळी निवडणूक आयोगाला करण्यात आला आहे. आता या प्रकरणावरील पुढील सुनावणी 6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगात होणार आहे.

अजित पवार गटाने (Ajit Pawar Group) निवडणूक आयोगात याचिका दाखल केली आहे. या याचिकेबाबत ही सुनावणी पार पडणार आहे. 6 तारखेच्या सुनावणीत शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्ही गट आपली भूमिका आयोगासमोर मांडणार आहेत. 6 तारखेच्या सुनावणीमध्ये निवडणूक आयोगाकडून दोन गट असल्याचे मान्य करत सुनावणी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ न दिल्याचे शरद पवार गटाने उत्तरात नमूद केले आहे. शरद पवार गटाकडून आपलं म्हणणं ऐकूनच निवडणूक आयोगाने पुढील निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे. (NCP Crisis)

शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला उत्तर

शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला दिलेल्या उत्तरामध्ये अनेक महत्त्वाच्या बाबी मांडल्या आहेत.
एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ज्यावेळी बंड केले त्यानंतर अजित पवार विरोधीपक्ष नेते म्हणून काम
पहात होते. त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. आता शरद पवार गट याच वक्तव्याचा आधार घेत
असल्याने अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
शरद पवार गटाने नऊ मंत्र्यांविरोधात याचिका दाखल केली आहे.
परंतु या नऊ मंत्र्यांशिवय 31 आमदारांच्या विरोधात देखील अपात्रतेची याचिका शरद पवार गटाने केली आहे. याशिवाय अजित पवार गटाने केलेले दावे शरद पवार गटाने फेटाळून लावले आहेत. 2022 मध्ये जी राष्ट्रीय कार्यकारिणी झाली त्याचे देखील दाखले देण्यात आले आहेत. त्या प्रतिक्रियांचे पालन करत माहिती निवडणूक आयोगात दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kondhwa News | ईद-ए-मिलाद मिरवणुकीदरम्यान पोलीस व कार्यकर्त्यांकडून कोंढवा परिसरातील वाहतुकीचे व्यवस्थापन