‘ज्यांना’ महाराष्ट्रानं नाकारलं ‘ते’ दिल्ली कशी ‘जिंकून’ देणार, राष्ट्रवादीची भाजपवर ‘टीका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने राज्यातील काही नेत्यांना दिल्लीत प्रचारासाठी बोलावून घेतले आहे. महाराष्ट्रातील नेते दिल्लीमध्ये भाजपचा प्रचार करत असून याच मुद्यावरून राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवदीने फेसबूक पोस्ट करत भाजपला टोला लगावताना ज्यांना राज्याने नाकारले ते दिल्ली कशी जिंकून देणार असा टोला लगावला आहे.

राष्ट्रवादीने फेसफूक पोस्ट करताना ‘दिल्ली निवडणुकीसाठी भाजपाचं महाराष्ट्र प्रचार कार्ड, जे राज्यात चाललं नाही ते दिल्लीत काय चालणार ?’ असा टोला भाजपला लगावला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी काही दिवस उरले आहेत. दिल्लीच्या जनतेने भाजपला साफ नाकारल्याचे अनेक सर्वेक्षणामधून समोर आले आहे. त्यामुळे दिल्ली निवडणुकीचा प्रचंड धसका घेतला असून दिल्ली आता आपल्या हाती लागणार नाही असेच जणू त्यांना वाटत आहे. त्यामुळे भाजपने आपल्या संभांची संख्या दुप्पट केली असल्याचा आरोप राष्ट्रवादीने फेसबूच्या माध्यमातून केला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासारख्या नेत्यांची फौज भाजपने दिल्लीत बोलावली आहे. तसेच भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि अमित शहा स्वत: या सभांना संबोधित करणार आहेत. भाजप दिल्ली जिंकण्यासाठी आता महाराष्ट्राचं प्रचार कार्ड वापरत आहे. पण ज्यांना महाराष्ट्राने नाकराल ते दिल्ली कशी जिंकून देणार हा प्रश्नच असल्याचा टोला राष्ट्रवादीने लगावला आहे.