राष्ट्रवादी काँग्रेसच्या दौंड तालुका अध्यक्षाचा राजीनामा

दौंड : वृत्तसंस्था (अब्बास शेख) दौंड तालुका अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष शफीक मुलाणी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या वयक्तिक अडचणींमुळे आपण हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी जिल्हाध्यक्ष हाजी सोहेल खान यांना पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

शफीक मुलाणी हे दहा वर्षांपासून या पदावर होते. दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना जिल्हाअल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष हाजी सोहेल खान यांनी त्यांना हे पद बहाल केले होते. परंतु आमदार राहुल कुल यांनी राष्ट्रवादी सोडून रासपच्या तिकिटावर उभे राहिल्यानंतर शफीक मुलाणी हे राहुल कुल यांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहिले होते. तालुक्यामध्ये आता दोन गटांचे रूपांतर दोन पक्षांमध्ये झाले असून नुसत्या गटा तटापर्यंत आता विषय राहिला नाही.

त्यामुळे त्यांनी आपला राजीनामा देऊन स्वतःला विद्यमान आमदार राहुल कुल यांच्यासाठी खुलेआम काम करता यावे. या करिता राजीनामा दिला असावा. असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र आपण आपल्या वयक्तिक अडचणींमुळे पक्षाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

Loading...
You might also like