विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा ५०-५० फॉर्म्युला, काँग्रेसच्या भुमिकेकडे लक्ष

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विधानसभेसाठी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या २ महिन्यांवर आल्याने दोन्ही पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जागावाटपासंदर्भात दोन्ही पक्षांची एक बैठक काल मुंबईत पार पडली. या चर्चेत दोन्ही पक्षांनी जागांसंदर्भात आपल्या वेगळ्या भूमिका मांडल्या. या बैठकीत राष्ट्रवादीने ५०-५० जागांची मागणी केली. त्यामुळे आता पुढील फेरीत यावर काय निर्णय होतो हे पाहणे महत्वाचे आहे.

लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती हि काँग्रेसपेक्षा उत्तम असल्याने राष्ट्रवादीने या मागणीला जोर लावला आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १७४ तर राष्ट्रवादीने ११४ जागा लढवल्या होत्या. मात्र यावेळी त्यांनी ५०-५० जागा लढवण्याची मागणी केल्याने या चर्चेला वेगळे वळण मिळणार आहे.

या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले आहेत तर काँग्रेसचा केवळ एक. यामुळे राष्ट्रवादी या पद्धतीने जागावाटपाचा जोर लावत आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस २०१४ च्या नुसार जागावाटप करण्यात यावे अशी मागणी करत आहे. म्हणजेच ज्या याठिकाणी दोन्ही पक्षांचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते त्यांनी त्या आणि जिंकलेल्या जागा घ्याव्यात आणि ज्या जागा शिल्लक राहतील त्यावर चर्चेने तिढा सोडवावा. त्याप्रमाणे जागावाटप करायचे ठरले तर काँग्रेसने जिंकलेल्या ४२ जागा आणि काँग्रेस उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ६४ अशा एकूण १०६ जागा काँग्रेसला तर राष्ट्रवादीने जिंकलेल्या ४१ आणि त्यांचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ५४ अशा एकूण ९५ जागा थेट दोघांना मिळाव्यात. त्यानंतर उरलेल्या ८७ जागांवर चर्चेच्या माध्यमातून तिढा सोडवावा अशी मागणी काँग्रेसकडून पुढे आली आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या या मागणीवर राष्ट्रवादी काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना आघाडीत घ्यायचे की नाही यावर देखील अजून काही निर्णय झालेला नाही त्यामुळे यासंदर्भात देखील पुढील बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे देखील याकडे लक्ष लागून आहे.

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

Loading...
You might also like