गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त धनंजय मुंडेंनी केलं ‘हे’ ट्विट

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती असून त्यानिमित्त बीडमधील गोपीनाथ गडावर दरवर्षी मेळावा आयोजित करण्यात येत असतो. यंदाही हा मेळावा आयोजित करण्यात आला असून अनेक दिग्गज नेते गडावर हजेरी लावत असतात. या सोहळ्यास स्वाभिमान दिवस असे संबोधले गेले असून यावेळी पंकजा मुंडे यांच्यासहित भाजपा आणि शिवसेनामधील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. दुपारी होणाऱ्या या मेळाव्याकडे महाराष्ट्रातील सर्व जनतेचे लक्ष लागलं आहे. आणि आजच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलणार असून गेल्या काही दिवसांपासूनच्या राजकीय घडामोडींबद्दल ते आपले मौन सोडणार आहेत.

No photo description available.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या आठवणी जागवत विनम्र गोपीनाथ मुंडेंना अभिवादन केलं आहे. ते म्हटले की, “आप्पा, तुमचाच वारसा चालवतो आहे. संघर्षाचा… जनसामान्यांच्या कल्याणाचा… सदैव आपल्या आठवणीत! जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन” असे ट्विट त्यांनी केले होते.

धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव करत विधानभवनात गेले असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे औरंगाबादमधील गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी केली आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून लिहिलं होतं की, “सबंध आयुष्य शेतकरी, कष्टकरी, वंचित घटकांसाठी परिश्रम करणाऱ्या लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांची उद्या जयंती आहे. यानिमित्ताने औरंगाबाद येथील स्व. मुंडे साहेब यांच्या स्मारकाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याची घोषणा करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली”.

दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रभर विविध कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त परळीमध्ये देखील स्वाभिमान सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. हा स्वाभिमान सप्ताह आजपासून म्हणजेच १२ ते १८ डिसेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं की, “पद्मविभूषण खासदार शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत १२ ते १८ डिसेंबर या कालावधीत स्वाभिमान सप्ताह साजरा केला जाणार असून पवार साहेब यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात गझलनवाज भिमराव पांचाळे यांच्या बहारदार गझलांचा कार्यक्रम ठेवण्यात आला असून संगीत क्षेत्रातील अनेक कलाकारांचा गौरव देखील करण्यात येणार आहे”. त्यामुळे आता गोपीनाथ गडावरील स्वाभिमान दिवस आणि परळीतील स्वाभिमान सप्ताह याची चर्चा सध्या महाराष्ट्रभर चालू आहे. तसेच आज गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे काय बोलणार याची देखील उत्सुकता सर्वांना लागलेली आहे.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/