राष्ट्रवादीकडून 19 जणांची जिल्हाध्यक्ष / कार्याध्यक्षांच्या नियुक्त्या जाहिर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापुर्वी 27 जिल्हाध्यक्ष / कार्याध्यक्ष पदाच्या नियुक्त्या जाहिर केल्या होत्या. आज (मंगळवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 19 जणांच्या जिल्हाध्यक्ष / कार्याध्यक्ष म्हणुन नियुक्त्या केल्या आहेत. पुणे शहराध्यक्ष म्हणून पुणे महानगर पालिकेतील विरोधीपक्ष नेते चेतन तुपे यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. आज नियुक्त्या करण्यात आलेल्यांमध्ये ठाणे, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, परभणी आणि यवतमाळ येथील पदाधिकार्‍यांचा समावेश आहे.
[amazon_link asins=’B00GASLORE’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’79f5f7e7-9fb5-11e8-8efd-75a5525b4f97′]

नियुक्त्या करण्यात आलेल्या जिल्हाध्यक्ष / कार्याध्यक्षांची नावे पुढील प्रमाणे आहेत. ठाणे शहर (आनंद परांजपे, कार्याध्यक्ष – संजय वढावकर), ठाणे ग्रामीण (दशरथ तिवरे), कल्याण-डोंबिवली (रमेश हनुमंते), उल्हासनगर (आ. ज्योती कलानी), भिवंडी शहर (खलिद गुड्डु, कार्याध्यक्ष- अनिल फडतरे), पुणे शहर (चेतन तुपे), सांगली शहर (संजय बजाज), कोल्हापूर शहर (आर.के. पोवार), कोल्हापूर ग्रामीण (ए.वाय. पाटील, कार्याध्यक्ष – राजेंद्र पाटील यड्रावकर), सोलापूर शहर (भारत जाधव, कार्याध्यक्ष – संतोष पवार), जळगाव ग्रामीण (रविंद्र भैय्या पाटील, कार्याध्यक्ष – विलास पाटील), अहमदनगर शहर (माणिकराव विधाते), परभणी ग्रामीण (आ. अबुल्‍ला खान अ. लतिफ खान दुर्राणी उर्फ बाबाजानी दुर्राणी) आणि यवतमाळ (आ. ख्वाजा बेग). उर्वरीत जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या लवकरच जाहिर करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्षांनी पत्रकाव्दारे कळविले असुन त्यांनी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचे तसेच कार्याध्यक्षांचे हार्दिक अभिनंदन देखील केले आहे.

संबधित बातमी
अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहाराध्यक्षाची निवड झाली