पक्षांतराची चर्चा ठरली खरी ! राष्ट्रवादीचे ‘हे’ माजी खासदार करणार भाजपात प्रवेश !

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली आहे अनेक आजी माजी पदाधिकारी पक्ष सोडून थेट सेना भाजपच्या वाटेवर जात होते. अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक हे सुद्धा भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती मात्र महाडिक यांनी भाजप प्रवेशाबद्दलच्या सर्व बातम्या फेटाळून लावल्या होत्या मात्र आता स्वतः धनंजय महाडिक यांनी आपण भाजपात प्रवेश केला असल्याचे म्हंटले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये धनंजय महाडिक यांना कोल्हापूरमधून पराभवाचा सामना करावा लागला होता. कोल्हापूरच्या पक्षाच्या अंतर्गत राजकारणामुळे महाडिक यांना पराभव सहन करावा लागला होता. १ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महाडिक भाजपचं कमळ हाती घेतील.

महाडिक यांचा भाजपात प्रवेश हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर महाडिक यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. राष्ट्रवादीला सातारा,सांगली या भागातून एका मागोमाग एक असे मोठे धक्के बसताहेत.

साताऱ्याचे उदयनराजे भोसले सुद्धा पक्ष बदलांतराच्या तयारीत आहेत अशी जोरदार चर्चा आहे मात्र अद्याप उदयनराजेंनी या गोष्टीबाबत स्पष्ट केलेलं नाही, मात्र खासदार धनंजय महाडिक यांनी १ सप्टेंबरला पक्षांतर करत भाजपात जाणार असल्याचे निश्चित केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –