NCP Film Cultural Department | मराठी चित्रपट सृष्टीला इंडस्ट्रियल दर्जा द्या, राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाची मागणी

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  मराठी चित्रपट सृष्टीला इंडस्ट्रियल दर्जा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाने (NCP Film Cultural Department ) एका निवेदनाद्वारे केली आहे. राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या (NCP Film Cultural Department) शिष्टमंडळाने राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख (Minister Amit Deshmukh) यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने या मागणीचे निवेदन मंत्री देशमुख यांना दिले. निवेदनातून आणखी काही मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil), अभिनेत्री प्रिया बेर्डे (Actress Priya Berde), अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar), अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके (Siddheshwar Zadbuke), प्रदेश सचिव मंगेश मोरे, राज्य समन्वयक संतोष साखरे उपस्थित होते.

NCP Film Cultural Department | Give industrial status to Marathi film industry, demand of NCP Film Cultural Department

निवेदनाद्वारे केलेल्या मागण्या

– मराठी चित्रपट सृष्टीला इंडस्ट्रियल दर्जा द्यावा

– म्हाडा आणि सिडको मध्ये कलाकारांना पाच टक्के आरक्षित घर मिळावीत

– सर्व जिल्ह्यांमध्ये वृद्ध कलावंत मानधन कमिटी नेमावी

– महाराष्ट्र शासनाची सांस्कृतिक कमिटी जाहीर करावी

– गेली पाच वर्ष मराठी चित्रपटांना अनुदान मिळाले नाहीत तेसुद्धा लवकर मिळावे

– वृद्ध कलावंत पेन्शन मध्ये जास्तीत जास्त वाढ करावी

अशा अनेक विषयांवर सांस्कृतिक मंत्री यांच्या बरोबर चर्चा झाली. पुढील पंधरा दिवसात या सगळ्या गोष्टी मार्गी लागतील असा शब्द सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख (Minister Amit Deshmukh) यांनी शिष्टमंडळाला दिला.

Web Title :Give industrial status to Marathi film industry, demand of NCP Film Cultural Department

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पिंकी परीयालकडून 2 सोन्याचे बिस्कीट जप्त; जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | पुण्यात 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची धमकी

Lonikand Police | लोणीकंद पोलिसांकडून खुनाच्या प्रयत्नातील 3 महिन्यापासून फरार आरोपीला अटक