राष्ट्रवादीचे ‘धनंजय’ भाजपच्या वाटेवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबता थांबेना आता मात्र भाजप सेना युतीने राष्ट्रवादीला खिंडार पाडायचे ठरवले आहे. त्यामुळे अनेक विरोधी पक्षातील नेते सेना – भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादीकडून नुकतेच लोकसभेची निवडणूक लढलेले कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक या महिन्याच्या शेवटी भाजपमध्ये प्रवेश करतील अशी सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. धनंजय महाडिक यांच्या विरोधात लोकसभेला त्यांच्या नेत्यांनी काम केल्यामुळे महाडिक पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते घड्याळ सोडून कमळ हाती घेतील अशी चर्चा आहे.

राष्ट्रवादीचे फलटणचे रामराजे निबांळकर हे सुद्धा भाजपात जाण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. निबांळकर यांच्या सोबत त्यांचे जावई राहुल नार्वेकर आणि फलटणचे आमदार दीपक चव्हाण हे देखील भाजमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांचे निकटवर्गीय असलेले पदमसिंह पाटील घराणे देखील भाजपाच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

भुजबळही शिवसेनेच्या वाटेवर
अनेक दिवसांपासून छगन भुजबळ हे सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. भुजबळ सेनेत जाणार ही कुणकुण शरद पवारांना लागली असल्यामुळेच रविवारी शरद पवार यांनी उडाले ते कावळे असा ठाकरी शैलीतला डायलॉग त्यांच्यासमोर मारल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा भुजबळ सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

आरोग्यविषयक वृत्त –