NCP Foundation Day | राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली जय्यत तयारी पण वर्धापन दिन मेळावा अचानक पुढे ढकलला; कारण…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात (Maharashtra Bhushan Award) उष्माघातामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राजकीय पक्षांनी हवामानाची चांगलीच धास्ती घेतली आहे. मैदानात जाहीर कार्यक्रम घेण्यासाठी सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राष्ट्रवादीने वर्धापन दिनाचे (NCP Foundation Day) औचित्य साधून 9 जून रोजी अहमदनगर (NCP Melava In Ahmednagar) येथे मेळावा आयोजित केला होता. उन्हाचा त्रास नको म्हणून राष्ट्रवादीचा हा मेळावा सायंकाळी ठेवला होता. परंतु आता, हवामान बदलले असून हवामान विभागाने (Meteorological Department) चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने सावध भूमिका घेत मेळावा (NCP Foundation Day) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबाबतची घोषणा केली.

व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा

https://twitter.com/NCPspeaks/status/1665992280556339200?s=20

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात शक्तिप्रदर्शन करण्यासाठी पक्षाने हा मेळावा (NCP Foundation Day) आयोजित केला होता. नगरसह शेजारच्या जिल्ह्यातील नेत्यांवर याची जबाबदारी देण्यात आली होती. केडगाव येथील मैदानाची जागा निश्चित करुन त्यावर तयारीही सुरू करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कर्यक्रम स्थळाची पाहणी केली होती. आढावा बैठक ही घेतली होती. मात्र आज हवामान विभागाचा अंदाज आल्याने हा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहिर केले.

अजित पवार यांनी ट्विट करत म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या 25 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचा कार्यक्रम, दि. 9 जून 2023 रोजी, केडगाव, अहमदनगर येथे
आयोजित करण्यात आला होता. मात्र, वेधशाळेच्या (Observatory) माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर
कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून त्याचे चक्रीवादळात (Cyclone) रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे.
या बिपरजॉय चक्रीवादळामुळे वेधशाळेने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामान्य नागरिक व प्रशासनाची गैरसोय होऊ नये म्हणून
तसेच वेधशाळेच्या सतर्कतेच्या इशाऱ्याचे पालन करून आपण वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम पुढे ढकलत आहोत,
अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांनी दिली.

Web Title :   NCP Foundation Day | ncp foundation day meeting in ahmednagar canceled due to cyclone warning

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pandharpur Ashadhi Wari 2023 | आषाढी वारीत ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरण करण्यास बंदी

Maharashtra Cabinet Expansion | शिवसेना वर्धापन दिनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार? भाजपच्या 6 व शिवसेनेच्या 4 जणांना स्थान मिळण्याची शक्यता

Corruption In Maharashtra Education Department | राज्यातील ‘त्या’ सर्व शिक्षक, शिक्षण अधिकार्‍यांच्या उघड चौकशीसाठी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे अ‍ॅन्टी करप्शनला पत्र, शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड खळबळ