राष्ट्रवादीकडून ‘त्या’ बंडखोर नेत्याची हकालपट्टी, शिवसेनेला ‘दिलासा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   राज्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची जय्यत तयारी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी भाजपा, मनसे या राजकीय पक्षांतील सर्वच पक्षांचे सर्व उमेदवारांचा धुमधडाक्यात प्रचार सुरू आहे. विजयासाठी नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी चांगलेच तयारीला लागेल आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने चंद्रशेखर उर्फ शेखर भोयर यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आघाडीचे अमरावतीतील अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. चंद्रशेखर उर्फ शेखर भोयर यांची हकालपट्टीने शिवसेनेला मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रक राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर प्रसिद्ध केले आहे.

राष्ट्रवादी’ने नक्की काय म्हटलं आहे या ट्विटमध्ये …

विधान परिषद अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या पक्षाकडून श्रीकांत गोविंद देशपांडे वैधरित्या नामनिर्देशित अधिकृत उमेदवार आहेत. चंद्रशेखर उर्फ शेखर भोयर हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढता आहेत. चंद्रशेखर उर्फ शेखर भोयर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कोणत्याही प्रकारचा पाठिंबा दिला नाही. त्यांनी केलेली कृती ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शिस्तभंग करणारी असल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशाने त्यांना पक्षातून काढून टाकण्यात येत आहे.

या महाविकासआघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात चंद्रशेखर उर्फ शेखर भोयर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने कोणत्याही प्रकारचा पाठींबा दिलेला नाही. पक्षाची शिस्त भंग केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत गोविंद देशपांडे यांना महाविकासआघाडीने अधिकृत उमेदवारी दिली आहे. तत्पूर्वी शिक्षक आघाडीचे श्रीकांत देशपांडे २०१४ च्या निवडणुकीत अमरावती शिक्षक मतदारसंघातून विजयी झाले होते. यावेळी ते महाविकासआघाडीचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत . भाजपने नितीन धांडे यांना उमेदवारी दिली आहे. दिलीप निंबोळ निंभोरकर हे शिक्षक भारतीतर्फे तर भाजपा नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांच्या बहीण संगीता शिंदे शिक्षण संघर्ष समितीकडून निवडणूक लढवतील. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रदीप प्रकाश काळबांडे काळबांडे हे देखील निवडणूक लढवणार आहेत.

दरम्यान, राज्यातील ५ विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. औरंगाबाद पदवीधर, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पाचही जागांसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. जुलै महिन्यात या जागांची मुदत संपली होती. मात्र, कोरोनामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.

You might also like