राष्ट्रवादीने माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना मोठे केले : अण्णा बनसोडे

मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन; विकासाची ग्वाही

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रवादीने पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी तसेच आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. या पदांवर काम करताना मी माझ्या वाट्याला आलेली जबाबदारी कसोशीने पार पाडत आलो आहे. पिंपरी मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मला मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी येथे केले.

पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ आकुर्डीतील विठ्ठल मंदिर चौकात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बनसोडे बोलत होते. यावेळी माजी महापौर योगेश बहल, अनिता फरांदे, पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा वैशाली काळभोर, स्थायी समितीच्या माजी सभापती शमीम पठाण, माजी उपमहापौर दिनकर दातीर पाटील, रेखा गावडे, राजू मिसाळ, नगरसेवक जावेद शेख, मोरेश्वर भोंडवे, माजी नगरसेविका सविता वायकर, गोपाळ कुटे, शंकरराव पांढारकर, निलेश पांढारकर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, सामाजिक न्याय विभाग महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष गंगाताई धेंडे, सचिन काळभोर, श्रीमंत जगताप, ज्ञानेश्वर कांबळे, यतीन पारेख, प्रदीप गायकवाड, कविता खराडे, मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले, के. के. कांबळे, हेमंत डांगे, दत्ता देवतरसे, चंद्रकांत दानवले, नितीन चव्हाण, पंकज दळवी आदी उपस्थित होते.

यावेळी बनसोडे म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसने मला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. या पाच वर्षात मी विकासाला प्राधान्य दिले. आपण जी चांगली कामे केली त्याची पावती म्हणून मतदारांनी या निवडणुकीत आपल्याला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन बनसोडे यांनी केले.

माजी महापौर योगेश बहल म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना अनेक विकासकामे केली. मात्र, महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून शहराची दुरवस्था झाली आहे. मतदारांनी याचा विचार करून राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आघाडीला विजयी करावे असे आवाहन बहल यांनी केले.

सभेपूर्वी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ आकुर्डी गावठाणात भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत महिला व युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या