Hasan Mushrif : ‘परमबीर सिंग यांना मुख्य आरोपी करणं केंद्र सरकारला मान्य नसावं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी आढळून आलेल्या कारमध्ये जिलेटीनच्या कांड्या आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करणारे NIA चे आयजीपी अनिल शुक्ला यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे. तर बदलीवरून राज्याचे ग्रामविकास मंत्री यांनी हसन मुश्रीफ यांनी प्रश्न केला आहे. इतक्या मोठ्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या आयजीपी अनिल शुक्ला यांच्या बदलीचं कारण काय? असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

शुक्ला यांच्या बदलीवरून हसन मुश्रीफ म्हणाले, अनिल शुक्ला यांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मुख्य आरोपी केलं असावं आणि हे केंद्र सरकारला मान्य नसावं, अशी शंका हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केली आहे. तर तत्कालिन पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सचिन वाझे या प्रकरणात सहभागी असावेत. तपास अजून का होत नाही. वाझेंची रवानगी कोठडीत झाली आहे तरीही चौकशी झालेली नाही. इतका मोठा तपास सुरु असतानाही बदली कशासाठी? काहीतरी शिजत असून त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील मुश्रीफ यांनी केलीय. पुढे मुश्रीफ म्हणाले, अंबानींच्या निवास्थानी स्फोटकं का ठेवली? कोणी ठेवली? हा तपास करण्याची आवश्यकता होती. तसेच परमबीर यांनी पत्र लिहिलं त्याचवेळी मी ते या कटात सहभागी असल्याचं म्हटलं होतं. ते माफीचे साक्षीदार होऊ इच्छित आहेत. मला या प्रकरणात वेगळा वास येत आहे असं सांगितलं होतं, असे हसन मुश्रिफ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, अनिल शुक्ला यांचा कार्यकाळ संपल्यानंतर रिक्त होणाऱ्या (आयजीपी) या पदावर उपमहानिरीक्षक असलेले ज्ञानेंद्रकुमार वर्मा यांची नियुक्ती करण्यात आलीय. शुक्ला यांना मिझोराम येथे बदली केली आहे. दरम्यान ५ वर्षांसाठी ‘NIA’ मध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. तसेच अनिल शुक्ला यांच्यावर कोणती जबाबदारी द्यावी, हा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालय घेईल, अस ते देखील अधिकाऱ्याने सांगितले आहे.