PM मोदींनी भाषणात उल्लेख केलेल्या शब्दाचा वापर करून राष्ट्रवादीनं उडवली भाजपची खिल्ली (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (दि. 8) यांनी सडेतोड भाषण केले. यावेळी मोदींनी नेहमीप्रमाणे नवीन शब्द शोधून काढला. ते म्हणाले की, श्रमजीवी, बुद्धिजीवी या शब्दाप्रमाणे देशात आता आंदोलनजीवी या नवीन जमातीचा जन्म झाला झाला आहे. वकीलांचे, विद्यार्थ्यांचे, कामगारांचे आंदोलन अशा सगळ्या ठिकाणी आंदोलनजीवी दिसतील. कधी पडद्यामागे, कधी पडद्यासमोर हे काम करतात. ही एक संपूर्ण टीम आहे. हे लोक आंदोलन केल्याशिवाय जगू शकत नाहीत. आपण अशा लोकांना ओळखले पाहिजे, असे आवाहनही पंतप्रधान मोदीनी भाषणातून केले. दरम्यान पीएम मोदी यांच्या आंदोलनजीवी शब्दानंतर राष्ट्रवादीनेही तोच शब्द घेऊन भाजपची खिल्ली उडवली आहे.

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधानांनी धन्यवाद प्रस्ताव मांडला. यावेळी शेतकरी, आंदोलन तसेच देशातील इतर मुद्दयांवर त्यांनी भाष्य केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरून झालेल्या गदारोळामुळे लोकसभेत कुठलीही चर्चा झालेली नाही. अशा परिस्थितीत सर्वांचे लक्ष पंतप्रधान मोदींच्या राज्यसभेतील अभिभाषणावर होते. शेतकऱ्यांनी आंदोलन संपवावे. एकत्रित बसून चर्चा करता येईल, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलकांना केले.

दरम्यान पीएम मोदी यांच्या आंदोलनजीवी शब्दानंतर राष्ट्रवादीनेही तोच शब्द घेऊन भाजपची खिल्ली उडवली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक आंदोलन सुरु आहेत. त्या आंदोलनांचा आणि पीएम मोदी बोललेल्या आंदोलनजीवी शब्दाचा संदर्भ घेऊन राष्ट्रवादीने ही पहा पंतप्रधान नरेंद्र मोदीनी उल्लेख केलेली नवीन जमात म्हणून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.