‘सोशल धमकी’ ! ‘जितेंद्र आव्हाड तुझा दाभोलकर होणार’

पोलीसनामा ऑनलाइन – तरुणाला मारहाण केल्याच्या आरोपावरुन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड वादाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. एकीकडे विरोधक जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत असून सोशल मीडियावरही संताप व्यक्त होताना दिसत आहे. अशातच एका तरुणाने जितेंद्र आव्हाड यांना तुझा दाभोलकर होणार असा इशाराच दिला असल्याने खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट लिहिल्याने आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप तरुण करत आहे. यामुळे आव्हाड यांचे नाव चर्चेत असून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.आव्हाड यांच्या प्रकरणावरुन सोशल मीडिया प्रतिक्रिया उमटत आहेत. यावेळी एका तरुणाने ट्विटरला कमेंट करताना ‘जितेंद्र आव्हाड तुझा दाभोलकर होणार’ असे म्हटले आहे. यामुळे सध्या खळबळ उडाली आहे.

ठाण्यातील एका व्यक्तीने जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे. यापृकरणी जितेंद्र आव्हाड यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्या बंगल्यावर असा कोणताही प्रकार झाला नाही. या घटनेबद्दल मला माहिती नाही. मी रात्री झोपलेला होतो. त्या दिवशी मी दिवसभर माझ्या विभागात काम करत होतो. त्यामुळे रात्री घरी येऊन झोपलो. मी मारहाणीचे समर्थन करणार नसल्याचे सांगितले.