कै. आर.आर. पाटील यांचे विश्‍वासू सहकारी, राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याचे मुंबईतील बैठकीला जाताना हृदयविकाराने निधन

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – कै. आर.आर. पाटील यांचे विश्‍वासू सहकारी आणि तासगांव तालुक्यातील सावळज गटाचे जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादीचे सदस्य चंद्रकांत बापू पाटील यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने आज (शनिवारी) निधन झाले. त्यांची प्राणज्योत लोणावळा येथील रूग्णालयात मालवली. चंद्रकांत पाटील यांच्या निधनामुळे सावळजवर शोककळा पसरली आहे. सावळज येथील बाजारपेठा बंद ठेवून त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यांच्यावर आज सायंकाळी अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व जिल्हा परिषद सछसयांची बैठक मुंबईला बोलावली होती. त्यासाठी पाटील हे मुंबईकडे निघाले होते. लोणावळयाजवळ त्यांनी ब्रेकफास्ट केला. गाडीत बसताना त्यांची शुगर अचानकपणे वाढली आणि त्यांना चक्‍कर आली. त्यांना लागलीच लोणावळा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. चंद्रकांत पाटील हे कै. आर.आर. पाटील यांचे जवळचे आणि अतिशय विश्‍वासू सहकारी होते. चंद्रकांत पाटील यांच्या निधनामुळे त्यांच्या मित्र परिवारावर आणि कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

आरोग्य विषयक वृत्त-
कमी वयात हार्ट अ‍ॅटॅक येण्याचे प्रमाण का वाढतेय ?
चिमुटभर हळदीने नष्ट होतील विविध आजार
डोळ्यांच्या इन्फेक्शनपासून असा करा बचाव
केळीच्या सालीचे उपाय चकित करणारे, जाणून घ्या फायदे

You might also like