पार्थ अजून लहान, त्याला सार्वजनिकरित्या सुनावणे योग्य नाही : अजित पवार

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर सार्वजिकरित्या केलेल्या आक्रमक टीकेची चर्चा शिगेला पोहोचली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलाची पाठराखण केली आहे.

’तो अजून लहान आहे, हळूहळू तयार होईल. मात्र त्याला असे सार्वजनिकरित्या खडेबोल सुनावणे योग्य नाही,’ अशा शब्दांत शरद पवार यांच्यासमोर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पक्षाच्या भूमिकेविरुद्ध मत मांडल्यामुळे शरद पवारांनी पार्थ यांना खडेबोल सुनावले होते. पार्थ प्रकरणावर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांची बैठक झाली. या बैठकीदरम्यान पार्थ पवार यांच्याबाबतीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत राष्ट्रवादीकडून अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

मात्र यावेळी अजित पवार यांनी मुलगा पार्थची बाजू सावरण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. कुटुंबातील सदस्याला सार्वजनिकरित्या सुनावल्यानंतर पवार कुटुंबात संघर्ष निर्माण होत आहे. त्यामुळे या सगळ्याबाबत अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like