‘या’ कारणामुळं अजित पवारांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांचं ‘अभिनंदन’ करणं टाळलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ऑक्टोबर महिन्याच्या 24 तारखेला राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्यानंतर अनेक राजकीय पक्षातील सख्ख वैरामध्ये बदललं तर अनेक राजकीय विरोधक एकवटल्याचे चित्र राज्यातील जनतेनं पाहिलं. राजकीय हालचालींना आलेला प्रचंड वेग आता मंदावला आहे. विधिमंडळाचं आज कामकाज सुरू झालं आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली.

त्यानंतर विरोधी पक्ष नेते पदी माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे फायरब्रॅन्ड नेते देवेंद्र फडणवीस यांनी निवड करण्यात आली. प्रथा आणि परंपरेप्रमाणे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फडणवीसांना त्यांच्या आसनाजवळ नेले आणि त्यांच्या स्थानावर बसवलं तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सभागृहातील इतर ज्येष्ठ नेत्यांनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या. मात्र, आठ दिवसांपुर्वी ज्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली म्हणजेच अजित पवारांनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या नाहीत.

विरोधी पक्ष नेते फडणवीसांचं अभिनंदन करण्यासाठी सर्वच गट नेत्यांनी आणि ज्येष्ठ नेत्यांनी भाषणं केली मात्र सर्वांचे लक्ष होते ते अजित पवार भाषण करतील की नाही याकडे. अजित पवारांनी भाषण करणं टाळलं. कारण आठच दिवसांपुर्वी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांबरोबर हातमिळवणी करून सरकार स्थापन केलं. ते सरकार अल्पमतात आल्यामुळं कोसळलं.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदे, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांनी भाषण करून शुभेच्छा दिल्या.

Visit : Policenama.com