जलसंपदा मंत्री गिरीष महाजन ‘नाच्या’ आघाडीतील ‘या’ नेत्याची जीभ घसरली

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मोदी सरकारनं कलम ३७० मधील तरतुदी शिथिल करण्यासह जम्मू-काश्मीरचं विभाजन केलं. त्यानंतर देशभरात जल्लोष करण्यात आला. भाजपाचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनीही याचा आनंद साजरा करत चक्क डान्स केला आहे. त्यांच्या नाचगाण्यावर राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी जोरदार हल्लाबोल करताना त्यांची जीभ घसरली. गिरीश महाजन यांचा नामोल्लेख न करता त्यांना ‘नाच्या’ असे म्हटले. अजित पवार सोलापूर येथे झालेल्या सभेत बोलत होते.

यावर प्रत्युत्तर देताना गिरीश महाजन यांनी मी डान्स केल्यावर अजित दादांच्या पोटात दुखण्याच कारण काय असा सवाल करत पाणी मागणाऱ्यांना तुम्ही काय बोलला होतात हे विसरलात का ? अशी खोचक टीकाही महाजन यांनी केली. नाशिकमध्ये पूर आला असताना मंत्री नाचतात, नाच्याचे काम तुमचे नाही मंत्री, अशा शब्दात अजित पवारांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे.

मी कोणाच्या बाप्पाला घाबरत नाही
अजून काही गोष्टी घडतील, काही लोक थांबतील काहीजण निघून जातील. सगळ्या भागातून आघाडीचे उमेदवार निवडून आले पाहिजेत. आपला आकडा १७५ जागांचा आहे. आपल्याला राज्यात आघाडी सरकार आणायचे आहे. त्यासाठी तुमची साथ असले तर मी कोणाच्या बाप्पाला घाबरत नाही असे आवाहन अजित पवार यांनी केले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like