मुख्यमंत्र्यांना फडण ‘दोन- झिरो’ म्हणायचे काय ? ; अजित पवारांची विधानसभेत ‘तुफान’ टोले बाजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधिमंडळाचे अधिवेशन सुरु झाले आहे. कालच विधिमंडळात अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. आज राज्यपालांचे भाषण झाले. राज्यपालांच्या भाषणानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. गणिताच्या मुद्यावरून अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यावरच निशाणा साधला. मुख्यमंत्री फडणवीसांना काय फडण दोन – झीरो म्हणायचं का ? असा सवाल त्यांनी केला. मुलांचं नुकसान होईल असे निर्णय घेऊ नका असंही त्यांनी सरकारला सुनावलं.

मनमुराद दाद आणि खडसेंचे विरोधकांकडून कौतुक

अजित पवार यांच्या तुफान फटकेबाजीला भाजप नेते एकनाथ खडसे यांनी मनापासून दाद दिली. एकनाथ खडसे यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अजूनही त्यांना मंत्रिपद देण्यात आलेले नाही. खडसे यांनी सभागृहात देखील वेळोवेळी भाजपच्या मंत्र्यांना कोंडीत पकडून खदखद व्यक्त केली होती. खडसे यांच्या अशा वागण्याचे विरोधकांकडून मुद्दाम कौतुक केले जाते.

विखे ठगांच्या टोळीत कसे सामील झाले ?

अजित पवार म्हणाले, समस्यांचा डोंगर फोडण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्ष नेत्यालाच फोडले.अजित पवार यांनी एक जुनी आठवण सांगत विखेंची फिरकी घेतली. विखे यांनी त्यांच्या बंगल्यावर Thugs of Maharashtra असं म्हणत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो लावले होते. मग ते लगेच ठगांच्या टोळीत कसे सामील झाले.

तुम्ही कोंडी केली म्हणून मी मोकळा श्वास घेतला – जयदत्त क्षीरसागर

जयदत्त क्षीरसागर यांचा अजित पवारांना टोला लगावला. मला मंत्रिपद मिळालं ही आपलीच मेहेरबानी. तुम्ही कोंडी केली म्हणून मी मोकळा श्वास घेण्यासाठी बाहेर पडलो. अजित पवार म्हणाले की, गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील हे स्वत:ला मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे समजतात, हेच सांगत होते की मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे म्हणून.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन