NCP Leader Ajit Pawar | ‘आपण युध्दात जिंकतो, तहात हरतो’ असं म्हणत अजित पवारांनी दिला मुख्यमंत्र्यांना सल्ला, म्हणाले – ‘मला गनिमी काव्याबद्दल…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Leader Ajit Pawar | कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर केलेल्या वक्तव्यानंतर दोन्ही राज्यांमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसेच मुख्यमंत्री बोम्मई यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत. त्यानंतर दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची अमित शाह यांच्यासमवेत बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीकडे दोन्ही राज्याच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्रीसुद्धा अमित शाहांची भेट घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सल्ला दिला आहे.

 

अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) म्हणाले, “आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा शिकवला आहे. आपण युद्धात जिंकतो आणि तहात हरतो, असं बऱ्याचदा बोललं जातं. त्यामुळे त्या दिवशी बैठकीत आपण महाराष्ट्राची बाजू मांडण्यात कुठेतरी कमी पडलो, असं राज्यातल्या जनतेला वाटता कामा नये. असं चातुर्य, हुशारी आपल्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी बाजू मांडताना दाखवावी. आपली बाजू कशी योग्य आहे आणि तिथल्या मराठी भाषिकांना कसा न्याय मिळायला हवा, हे पटवून देण्याचा प्रयत्न करावा.”

त्यानंतर, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी नेमका कसा गनिमी कावा करावा, असा प्रश्न पत्रकारांनी करता अजित पवारांनी (Ajit pawar) त्यावर उत्तर दिले. “जाहीरपणे असं काही सांगत नाहीत. इथून कर्नाटकनं ऐकलं तर त्याला काही अर्थ राहणार नाही. मला त्यांनी (मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री) विचारल्यावर सांगेन,” असे अजित पवार म्हणाले. त्यानंतर उपस्थितांना त्यांचे हसू आवरता आले नाही.

 

Web Title :- NCP Leader Ajit Pawar | ncp ajit pawar on maharashtra karnataka border
dispute cm eknath shinde devendra fadnavis amit shah meeting

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा