home page top 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल अजित पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून अनेक राजकीय पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. तर प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडू लागली असून राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापले आहे. काल अहमदनगरच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर आता अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

वेगळ्या विदर्भावरुन महाराष्ट्रात अनेकवेळा राजकारण तापले आहे. भाजपच्या नेत्यांनी देखील अनेक वेळा वेगळ्या विदर्भाचे समर्थन केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देखील अनेकदा या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले आहे. त्याचबरोबर भाजप हा छोट्या राज्यांसाठी प्रयत्नशील असल्याचे देखील अनेकदा त्यांचे नेते सांगत असतात. मात्र आता याबाबतीत अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट करून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले कि, आमच्या सत्तेला साडेचार वर्ष पूर्ण झाल्यानंतर आम्ही विदर्भ वेगळा करू, राज्याबरोबरच केंद्रात देखील आमची सत्ता आहे, त्यामुळे आम्हाला अडचण येणार नाही, असे फडणवीस यांनी खासगीत बोलल्याचे अजित पवार यांनी सांगितले. एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अजित पवार यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

दरम्यान, मोठ्या प्रमाणात असलेल्या बहुमतामुळे आणि अखंड महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याचे मनात आल्याने त्यांनी आपले मत बदलल्याचे किंवा तो विचार मागे पडल्याचे देखील यावेळी अजित पवार यांनी सांगितले.

Visit : Policenama.com

Loading...
You might also like