‘महाविकासआघाडी’ म्हणजे ‘मल्टिस्टारर’ सिनेमा ? अजित पवार म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकासआघाडी सरकार मल्टीस्टारर सिनेमा असल्याचे सार्वजिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केले होते. यावरच अजित पवार यांनी प्रश्न विचारल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सूचक वक्तव्य केलं. जुन्या कढीला कशाला ऊत आणायचा, बरं चाललंच, चालू द्या. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार नियोज विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थित होते, बैठकीनंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला.

यावेळी सर्व विभागांना निधीचं योग्य वाटप होणार असल्याची हमी देत बैठकीला मी पालकमंत्री म्हणून उपस्थित होतो. चंद्रपूरच्या दारुबंदीवर कोणताही पुनर्विचार केला गेला नसल्याचे ते म्हणाले.

अशोक चव्हाण यांनी मांडलेल्या मतावर अजित पवार यांनी फारसं बोलण टाळलंच. जुन्या कढीला कशाला ऊत आणायचा, बरं चाललंय, चालू द्या. मला माझ्याकडून काही अडचण आणायची नाही. माझे अधिकारी वेळेत यायला तयार आहेत, मी काम करतोय अशी त्रोटक प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

काय म्हणाले होते अशोक चव्हाण –
तीन पक्षांचं सरकार म्हणजे मल्टीस्टारर सिनेमा. सिनेमात तीन-तीन हिरो पाहिजेत असं सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण म्हणाले होते. नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सोनिया गांधींनी सत्तास्थापनेच्या वेळी सांगितलं होत की संविधानाच्या चौकटीत राहून सरकार चालल पाहिजे असे शिवसेनेकडून लिहून घ्या.

पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की तीन पक्षांचं सरकार म्हणजे मल्टिस्टारर सिनेमा, सुदैवानं आमचा सिनेमा सध्या बरा चालला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी असो किंवा उद्धव ठाकरे, कुणालाही वाटलं नाही की आम्ही एकत्र येऊ. परंतु हल्ली मल्टिस्टारर सिनेमाचा जमाना आहे. सिनेमात तीन तीन हिरो पाहिजेत असं अशोक चव्हाण म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like