अजित पवारांकडून विलासराव देशमुखांच्या मुलाचं कौतुक, म्हणाले…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेत सध्या तरुण आमदारांची चांगलीच चर्चा आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार धीरज देशमुख यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. धीरज यांची बोलण्याची स्टाईल आणि शब्दफेक हुबेहूब विलासरावांसारखीच वाटते असे अजित पवार यावेळी म्हणाले. अजित पवारांनी युवासेनाप्रमुख आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांचे देखील यावेळी कौतुक केले आहे.

आदित्य ठाकरेंबद्दल काय म्हणाले अजित पवार
मी मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे असे आदित्यचे वागणे नाही, बैठक असली आणि कोणी जेष्ठ नेता आला तर आदित्य लगेच खुर्ची खाली करून देतो असे सांगत अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांची प्रशंसा केली. तसेच आदित्य नवखा आहे, सगळ्यांमध्ये मिसळतो काय करता येईल ते सभागृहात पाहतो. त्याच्यात मी पणा दिसत नाही, अहंकार दिसत नाही हे कौतुकास्पद आहे. असे अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांचं तोंडभरून कौतुक केले आहे.

अजित पवारांना मोठा दिलासा
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा एकदा क्लीन चिट मिळाली आहे. सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर आज अजित पवार यांना या प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी आज एसीबीकडून पूर्णपणे क्लीन चिट देण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात तसे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रात एसीबीने न्यायालयाला अजित पवार निर्दोष असल्याचे सांगितले आहे.

अजित पवारांनी दिला भाजपला धक्का
पुणे महानगरपालिकेतील प्रभाग पद्धती रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून पहिल्याच अधिवेशनात घेण्यात आला आहे. प्रभाग पद्धतीमुळे पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता आली होती. त्यामुळे हा निर्णय भाजपसाठी मोठा धक्कादायक मानला जात आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार यासाठी आग्रही होते असे सांगण्यात येते त्यामुळेच सत्तेवर येताच पहिल्याच अधिवेशनात सरकारने हा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या निर्णयाला विधानसभेत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता 2022 मध्ये होणारी महानगरपालिकेची निवडणूक ही वॉर्ड पद्धतीने होणार आहे.

पुणे मनपात सध्या 162 नगरसेवक आहेत. प्रभाग पद्धत रद्द करण्यात आल्याने ही संख्या 168 पर्यंत जाईल. वॉर्ड पद्धतीमुळे नगरसेवकांची संख्या सहा ने वाढणार आहे. भाजपने सुरु केलेल्या पद्धतीने अनेक महानगर पालिकांमध्ये भाजपला फायदा झाल्याचा आरोप विरोधातील अनेक नेत्यांनी केला होता. त्यामुळे आता विरोधक सत्तेवर येताच त्यांनी हा निर्णय बदलला आहे. त्यामुळे आता या नव्या निर्णयामुळे सत्तेवर आलेल्याना कितपत फायदा होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/