‘चंपा’ला पवारांशिवाय काही दिसत नाही, अजित पवारांनी उडवली चंद्रकांत पाटलांची ‘खिल्ली’ (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भविष्यात जर पवारांच्या घरातील कुणी भाजपमध्ये येणार असेल तर त्याचं आश्चर्य वाटू देऊ नका असं भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्यावरून अजित पवार यांनी आज एका पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली आहे. त्या ‘चंपा’ला पवारांशिवाय काही दिसत नाही अशी टीका केल्यानंतर चंपा म्हणजे कोण ? याचे देखील स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.

पिंपरी-चिंचवड मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांना चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारले असता त्यांनी चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली. अजित पवार म्हणाले, पवारांच्याशिवाय त्या चंपाला काही दिसतच नाही. चंपा म्हणजे हा शॉर्ट फॉर्म आहे. जसे की अप म्हणजे अजित पवार तसेच चंपा असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या उत्तराने एकच हशा पिकला.

पुढे ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील (चंपा) जे बोलतात त्याला काही अर्थ नाही. प्रत्येक वेळेस शरद पवार हे राजकारणातून दूर जातील असं ते म्हणतात. शरद पवारांनी अनेक चढउतार पाहिले आहेत. 55 आमदारांपैकी 50 आमदार निघून गेले. पाच आमदार राहिले तरीही तितक्याच तत्परतेने ते बाहेर पडले. आज ही शरद पवार हे आक्रमक भूमिकेतून हे सरकार बदलायचं अस सांगतात. असे उत्तर अजित पवार यांनी पत्रकांरांनी विचालेल्या प्रश्नाला दिले.

Visit : Policenama.com 

You might also like