Pune News : ‘कुणाच्या किती बायका, कुणी किती मुलं लपवली, सांगू का ?’ अजित पवारांनी भाजप नेत्यांना खडसावलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या महिलेने तक्रार मागे घेतली आहे. पण भाजपच्या नेत्यांनी दबावामुळे तक्रार मागे घेतल्याची टीका केली आहे. याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुंडे यांनी करुणा शर्माबाबत जे सांगायचे होते, ते त्यांनी जाहीरपणे सांगून टाकले आहे. विरोधकांनी उगीच फाटे फोडू नये. मग इतराच्या भानगडी बाहेर काढायला गेलो तर विषय खूप व लांब जाईल. कुणी काय लपवाछपवी केली, कुणाचे लग्न झाले होते, कुणाला किती मुल होती. लग्न झाल होते की नाही, कुणाच्या किती बायका आणि कुणी किती मुलं लपवली, हे काय आम्हाला ठाऊक नाही का? अशा बऱ्याच गोष्टी आहे, कशाला खोलात जाण्यास सांगत आहात, असे म्हणत पवार यांनी आपल्या स्टाईलने भाजप नेत्यांना जोरदार प्रत्युउत्तर दिले.

उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे जिल्हा नियोजन आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना कृषी कायद्यापासून ते धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर सडेतोड उत्तर दिली. आता विरोधक काय म्हणतील याचा नेम नाही. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर भाजप नेत्यांनी रान उठवल होते. नंतर त्या महिलेनं तक्रार मागे घेतल्यामुळे तोंडघशी पडले. आता थातूरमातूर उत्तर दिली जात आहे. आणि त्यामध्ये लोकांची दिशाभूल केली जात असल्याची टीका पवार यांनी केली आहे.

दरम्यान केंद्रीय कृषी कायद्यांना राज्यात आता स्थगिती मिळाली आहे. शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या कोणत्याही कायद्याला आमचे समर्थन नसल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.