अजित पवार हे ‘गनिमी काव्याचे नायक’ : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. मात्र, हे सरकार स्थापन होण्या आधी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. तीन पक्षांकडू सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा सुरु असतानाच अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत राज्यात भाजपचे सरकार स्थापन केले. त्यामुळे राजकीय भूकंप झाला. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. हे सरकार अवघे 80 तास टिकले. यावर बोलताना आमच्या गनिमीकावा फसल्याची कबुली माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ही कबुली दिली. यावेळी त्यांना अजित पवारांचे वर्णन कसे कराल असे विचारले असता त्यावर अजित पवार आमच्या फसलेल्या ‘गनिमी काव्याचे नायक’ असल्याचे गमतीशीर उत्तर त्यांनी दिलं. अजित पवार गनिमी काव्यातील नायक असतील तर तुम्ही कोण. यावर फडणवीस म्हणाले, ‘मी फसलेल्या गनिमी काव्याचा सहनायक’ होतो, असे हजरजबाबी उत्तर त्यांनी दिले.

शरद पवारांवर बोलताना फडणवीस म्हणाले, पवार राजकारणातले ज्येष्ठ नेते आहेत. पंकजा मुंडे माझ्या सहकारी आहेत. त्या बहिणीसारख्या आहेत. सत्ता असताना जेव्हा जेव्हा त्यांच्यावर आरोप झाले. तेव्हा तेव्हा मी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहीलो असल्याचे फडणवीसांनी सांगितले. एकनाथ खडसेंबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, ते अनेकदा मनात नसलेल्या गोष्टी बोलून जातात, त्यामुळे त्यांचे वैयक्तिक आणि राजकीय नुकसान होते. या गोष्टी त्यांनी लक्षात ठेवल्या तर त्यांचा फायदा होईल असेही ते म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/