जितेंद्र आव्हाडांनी सांगितला अतिशय कठीण प्रसंग, म्हणाले….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोना संसर्गाची लागण झाली होती. मात्र, आता कोरोना संसर्गावर मात करून ते घरी परतले आहेत. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी त्यावेळी निर्माण झालेल्या कठीण प्रसंगाबद्दल भाष्य केलं आहे.

आव्हाड यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना संगितलं की, ‘ सुरुवातीच्या वेळेस मला कोरोना संसर्गाची लक्षणं दिसली नव्हती. परंतु, रुग्णालयात दाखल केल्यावर माझी स्थिती लक्षात घेता मला फोर्टिज रुग्णालयात दाखल केलं. तसेच डॉक्टरांनी माझ्या मुलीला बोलवून घेत ७० टक्के केस हाताबाहेर गेल्याच सांगितलं होत, असा खुलासा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

‘अतिशहाणपणा केल्यानं मला कोरोनाचा संसर्ग झाला. लोकांनी मला मास्क घाला असं सांगितलं होत. गर्दीत गेल्यावरती मी अनेकदा मास्क वर नाकावर सरकवून घ्यायचो. हे नियम समाजाने पाळायला हवेत. नियम पाळले असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती एक अद्दल घडवण्यासाठीच कदाचित हे सगळं घडलं असं माझं मत आहे. असं आव्हाड यांनी सांगितलं.

तसेच आयसीयुत असताना आपण एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीत ‘मला काही झालं तर सगळी संपत्ती माझ्या मुलीच्या नावावर करण्यासंबंधी त्यात लिहलं होत. अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.